पाटणा रेल्वे स्थानकावर सर्वाधिक आंबटशौकिन

wifi
पाटणा- सर्वाधिक वाय-फायचा वापर देशातील इतर रेल्वे स्थानकांच्या तुलनेत पाटणा रेल्वे स्थानकावर केला जात असून, या रेल्वे स्थानकावरून पॉर्न साइट सर्वाधिक पाहिल्या जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

सरकारने देशातील २३ रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याबाबत रेलटेलच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेटचा वापर देशातील इतर रेल्वे स्थानकांच्या तुलनेत पाटणा स्थानकावर सर्वाधिक होत आहे. पाटणानंतर जयपूर, बंगळूर व नवी दिल्लीचा क्रमांक लागतो. परंतु पाटणा रेल्वे स्थानकावरून सर्वाधिक पॉर्न सर्च केले जाते. पॉर्न व्हिडिओ व छायाचित्रे मोठ्या प्रमाणात डाऊनलोड केल्या जातात.

बिहारमध्ये पाटणा रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फायची सुविधा उपलब्ध आहे. दिवसभरात येथील स्थानकावर २०० रेल्वेगाड्या येतात. यामुळे मोफत वाय-फाय वापरणा-यांची संख्या मोठी आहे. पॉर्न साइटबरोबरच अनेकजण विविध ऍप्स डाऊनलोड करतात. शिवाय, बॉलिवडू, हॉलिवूडमधील चित्रपटांचेही डाऊनलोड होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

Leave a Comment