ट्विटरला मिळेना खरेदीदार

twitter
मायक्रोब्लॉगिग साईट ट्विटर कुणाच्या मालकीची होणार याच्या चर्चेने बाजार गरम असला तरी सध्या तरी ट्विटरच्या वाट्यास निराशाच आल्याचे दिसून आले आहे. ट्विटरच्या संभावित खरेदीदारात सर्वात आघाडीवर असलेल्या सेल्सफोर्स ने ट्विटरच्या खरेदीतून माघार घेतल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. ट्विटरसाठी आम्ही बोली लावणार नाही असे सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनियोफ यांनी स्पष्ट केले आहे. सेल्सफोर्स ही क्लाऊड काँम्प्युटिग क्षेत्रातील कंपनी आहे. ट्विटरच्या खरेदीसाठी २० अब्ज डॉलर्सची बोली लागेल असे अनुमान जाणकार व्यक्त करत होते.

सर्च इंजिन गुगल, अॅपल तसेच वॉल्ट डिस्ने यांनाही टिवटरचे संभावित खरेदीदार म्हणून पाहिले जात होते. गुगल व वॉल्ट डिस्ने यांनी या लिलावातन पूर्वीच माघार घेतली आहे. यामुळे ट्विटरचा शेअरही घसरला आहे. ट्विटरचे ३१.३० कोटी युजर्स आहेत मात्र नवीन युजर्स जोडण्यासाठी कंपनी करत असलेल्या संघर्षाला यश येताना दिसलेले नाही.

Leave a Comment