चीनने लाँच केले शेंझू-११ अंतराळ यान

astro
बीजिंग- शेंझू-११ स्पेस एयरक्रॉफ्ट चीनने सोमवारी लाँच केले असून यात दोन अंतराळवीर असतील जे अंतराळातील लॅंब स्पेसमध्ये ३० दिवस राहतील व तेथील निरीक्षण नोंदवतील. चीनची आतापर्यंतची ही सर्वात मोठी मानवी अंतराळ मोहिम असून दीर्घकाळाची ही मोहीम आहे. २०२२ पर्यंत चीनच्या मालकीची कायमस्वरूपी अवकाश स्थानक स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाचे योगदान देणार आहे. आता अवकाशात त्यांची टेम्पररी लॅब थियानगोंग-२ पृथ्वीला फे-या घालत आहे. चीनची मानवी अंतराळ मोहिम २००३ साली सुरु झाली होती.

शेंझू-११ या अंतराळ यान अवकाशात सोडताना अनेक विदेशी शास्त्रज्ञ तसेच मिडिया उपस्थित होता. चीन सामान्यपणे परदेशी मिडियाला कव्हरेज करण्यास परवानगी देत नाही. – चीनचा उत्तरी भागातील गॉबी प्रदेशातील केंद्रावरून हे यान झेपावले. मोहिमेत जिंग हे पेंग (५०), चेन डाँग (३७) हे दोघे अंतराळवीर या मोहिमेतंर्गत ३० दिवस अवकाशात राहतील. चीनने यावर्षी तिस-यांदा आपली अंतराळ मोहिम राबवली आहे. या अगोदर चीनने २००३ मध्ये पहिली मानवी मोहीम आखली होती. त्यावर अब्जावधी डॉलर्सचा खर्च झाला होता.

चीनने आपल्या स्पेस मिशनवर मागील १० वर्षात अब्जावधी डॉलर खर्च केले आहेत. चीन अमेरिका, रशिया, भारत आणि जपानची बरोबरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. चीन २०२५पर्यंत चंद्रावर माणूस पाठवायचा आहे. सोबतच मंगळावर अमानवी व्हेईकल पाठवायचे आहे.

Leave a Comment