आज भारताच्या अग्निपंखाची जयंती

apj-abdul-kalam
मुंबई – आपल्यासाठी आजही देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे भाषण, विचार प्रेरणादायी आहेत. एक असामान्य व्यक्तिमत्व असलेले ए. पी. जे. अब्दुल कलाम हे आपल्या भाषणांनी आणि विचारांनी नेहमीच इतरांना स्फूर्ती देत होते. अशाच असामान्य व्यक्तिमत्वाला त्यांच्या जयंती निमित्त माझा पेपरची भावपूर्ण आदरांजली.

सामान्यपणे अब्दुल कलाम यांच्या बद्दलच्या माहिती नसलेल्या काही गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील.
१) डॉ. अब्दुल कलाम यांचे तीन सर्वात जवळचे मित्र होते. हे तिन्ही ब्राम्हण कुटुंबातील होते आणि त्यांची नावे रामानंद शास्त्री, अरविंदम आणि शिवप्रकसन अशी होती.

२) डॉ. कलाम हे देशाचे राष्ट्रपती होण्यापूर्वी एका खोलीमध्ये राहत होते आणि देशाच्या आघाडीच्या संरक्षण तंत्रज्ञानासाठी नव्या शोधाचे काम करत होते.

३) दाक्षिणात्य पदार्थ विशेष करून इडली डॉ. अब्दुल कलाम यांना खूप आवडायची.

४) राष्ट्रपती पदासाठी अब्दुल कलाम यांचे नाव निवडले गेल्यानंतर शपथविधीच्या कार्यक्रमाला त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत विमान प्रवासाचे तिकीट उपलब्ध होते. मात्र, कलाम यांनी पदाचा कोणत्याही वैयक्तिक कामासाठी वापर केला नाही. त्यांनी आपल्या नातेवाईकांना सेंकड एसी रेल्वेने दिल्लीला शपथविधीसाठी आणले.

५) एकदा राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांची खूर्ची एका दीक्षांत समारंभात इतर खूर्च्यांपेक्षा वेगळी आणि मोठी होती. त्यामुळे त्यांनी त्या खूर्चीवर बसण्यास नकार देत, साध्या खूर्चीवर ते बसले होते

६) रामनाथपुरमला डॉ. अब्दुल कलाम यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले.

७) एकदा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतांना अचानक लाईट गेले. मात्र, आपल्या चर्चेत, भाषणात कुठेही बाधा न येऊ देता डॉ. अब्दुल कलाम यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांच्यामधून रांगेत फिरत आपली चर्चा कायम ठेवली.

Leave a Comment