जर्मन संशोधकांनी बनविला अतिसूक्ष्म कॅमेरा

camera
जर्मनीतील अभियंते संशोधकांनी मीठाच्या कणाच्या आकारापेक्षाही लहान कॅमेरा तयार केला असून हा नॅनो कॅमेरा थ्रीडी प्रिटींगच्या तंत्रज्ञानाने तयार केला गेला आहे. मेडिकल सायन्समध्ये हा कॅमेरा अभूतपूर्व क्रांती करू शकणार आहे.विशेष म्हणजे या कॅमेर्‍याचे डिझाईन कांही तासांच्या अवधीत केले गेले असून त्याची चाचणी यशस्वी झाली आहे. स्टुटगार्ड विद्यापीठातील संशोधकांनी हा कॅमेरा तयार केला आहे.

या कॅमेर्‍याला १०० मायक्रोमीटर व १२० मायक्रोमीटरची कपौंड लेन्स आहे. हा कॅमेरा ३.० मिलीलिटर अंतरावरून फोटो काढू शकतो. विशेष म्हणजे तो इंजेक्शनच्या सुईमधून मानवी शरीरात सोडता येतो. हा कॅमेरा ऑप्टिकल फायबरच्या टोकाशी फिट करता येतो व शरीराच्या कोणत्याही भागात तो सहज डोकावू शकतो. हा कॅमेरा स्नायूंचे हायरेझोल्युशन फोटो काढतो. फोटोनिक्स सायन्स जर्नलमध्ये या कॅमेर्‍याची माहिती दिली गेली आहे.

Leave a Comment