आता घरबसल्या बनवा कलर वोटर आयडी

voter-id
नवी दिल्ली – तुमच्याकडे जर वोटर आयडी नसेल तर मुलीच काळजी करु नका. कारण आता तुम्ही घरी बसल्या तुमचे कलर वोटर आयडी बनवू शकणार आहात. यासाठी तुमच्याकडे केवळ सफेद बॅकग्राउंड असलेला एक कलर फोटोग्राफ असणे गरजेचे आहे.

तुम्हाला सर्वात आधी निवडणूक आयोगाच्या http://www.nvsp.in/ या वेबसाईटला क्लिक करावे लागणार आहे. http://www.nvsp.in/ वेबसाईटवर गेल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला तुमची आवश्यक माहिती, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अपलोड करावा लागणार आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर तुम्ही तुमची आवश्यक माहिती अपलोड केल्यानंतर त्या खाली तुम्हाला तुमचा फोटोग्राफ अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, तुम्ही अपलोड करत असलेल्या कलर फोटोग्राफचा बॅकग्राउंड हा सफेद रंगाचा असायला हवा. वोटर आयडीचे खुप महत्व असल्यामुळे ऑनलाईन अर्ज भरत असताना काळजीपूर्वक भरा.

वोटर आयडी बनवत असताना कुठलीही चूक होता कामा नये. मात्र, जर एखादी चूक झाली आणि ती तुम्हाला नंतर लक्षात आली तर तुम्ही १५ दिवसांपर्यंत त्यामध्ये सुधारणा करु शकता. त्यानंतर तुम्ही तुमच्या वोटर आयकार्डचे अॅल्पिकेशन स्टेटसही ऑनलाईन चेक करु शकता.

ज्या प्रमाणे पासपोर्ट बनविण्यासाठी वेरिफिकेशन होते, अगदी त्याचप्रमाणे तुमची माहिती ऑनलाईन फिल-अप केल्यानंतर बूथ लेवलचा अधिकारी तुमच्या घरी चौकशीसाठी येईल. तो अधिकारी तुमच्या कागदपत्रांची तपासणी करेल जे तुम्ही अपलोड केले आहेत. यानंतर एका महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला भारतीय पोस्टच्या माध्यमातून वोटर आयकार्ड घर बसल्या उपलब्ध होईल.

वोटर आयडी बनविण्यासाठी तुम्हाला निवासी पत्त्याचा दाखला आणि आयडी प्रूफ म्हणून इतर आवश्यक कागदपत्रांची गरज असणार आहे. यासाठी पासपोर्ट, दहावीची मार्कशिट, बर्थ सर्टिफिकेट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, बँक पासबुक, फोन बिल, पाण्याचे बिल, विजेचे बिल, गॅसची पावती, इनकम टॅक्स फॉर्म नंबर १६ यापैकी दोन कागदपत्रांची स्कॅन कॉपी तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे.

Leave a Comment