शत्रूला चकविण्यासाठी रशियाकडून बनावट शस्त्रे, वाहनांचा वापर

rashi
रशियाने शत्रूला चकविण्यासाठी बनावट शस्त्रे व वाहने सीमाभागात तैनात केली असल्याचे वृत्त आहे. यात जेट, मिसाईल्स, टँक, मिलीट्री ट्रक्स बरोबरच सुखोई २७, मिग ३१ विमानांचाही समावेश आहे. टी७२, टी८० टँकही यात सामील आहेत. ही हत्यारे व वाहने अगदी खर्‍यासारखीच भासतात पण रडार ती खरी की खोटी हे ओळखू शकत नाहीत. फुग्यासारखी ती पाच मिनिटात फुगवून तयार करता येतात व अगदी खर्‍या वाहनांसारखी दिसतात.अर्थात बनावट हत्यारे व शस्त्रांचा वापर दुसर्‍या जागतिक महायुद्धापासून केला जात आहे. यूएस, इंग्लंडने या कल्पनेचा यशस्वी वापर केला होता.

रशियाने या बनावट शस्त्रे, वाहनांना मास्कीर्वोका असे नांव दिले असून मास्कींग म्हणजेच बनावट. शत्रूला अचानक धक्का देण्याची व धोका देण्यासाठी ही मनोवैज्ञानिक रणनिती वापरली जाते. रसबल कंपनी या प्रकारची बनावट शस्त्रे व वाहने बनविण्यात प्रसिद्ध असून रशियाने त्यांच्याकडूनच ही सामग्री विकत घेतली आहे. अशी बनावट वाहने कमी खर्चात मिळतात व झटपट तयार करता येतात त्यामुळे त्यांचा वापर अनेकदा केला जातो असेही समजते.