रेनोने परत मागविल्या ५१ हजार क्विड

kwid
नवी दिल्ली – आपली सर्वाधिक विकली जाणारी एंट्री लेव्हल कार क्विडच्या ५१ हजार युनिट्सचे फ्रान्सची ऑटोमोबाइल कंपनी रेनॉने रिकॉल केले आहे. यासाठी कंपनीने इंधन यंत्रणा आणि होस क्लिपमधील बिघाड कारण सांगितले जात आहे. रेनो इंडिया क्विड (८०० सीसी)च्या निवडक मॉडेलचे निरीक्षण करत आहे. ऑक्टोबर २०१५ ते १८ मे २०१६ पर्यंत बनलेल्या कार्स परत मागविल्या जात आहे. तर निसान मोटर्सने आपली स्मॉल कार रेडी-गोच्या ९३२ युनिट्स परत मागविल्या आहेत. रेडी-गोमध्ये देखील इंधन व्यवस्थेत बिघाड दिसून आला.

दरम्यान निवडक कार्समध्ये फ्यूएल होस क्लिप लावले जात आहे. काही पावले इंधन पुरवठय़ाच्या कोणत्याही धोक्यापासून वाचण्यासाठी देखील उचलली जात आहेत. कारची तपासणी आणि सुटय़ाभागांची बदली मोफत होईल असे कंपनीने स्पष्ट केले. कंपनीने ग्राहकांशी संपर्क साधत वितरकाकडे जाऊन कारची तपासणी करण्याची सूचना केली आहे. रीकॉल केल्या जाणा-या एकूण वाहनांपैकी फक्त १० टक्के वाहनांमध्येच बिघाड असू शकतो असे मानले जात आहे.

Leave a Comment