भूतबाधा काढण्यासाठी या हनुमान मंदिरात होते गर्दी

hanuman
माणसाला भूताची प्रेताची बाधा होऊ शकते यावर तमाम भारतीयांचाच नव्हे तर जगातही अनेकांचा विश्वास आहे. अशी बाधा झालेल्या व्यक्तीवर अनेक अघोरी उपायही केले जातात. मात्र राजस्थानच्या मेहंदीपूर बालाजी मंदिरातील स्वयंभू बाल हनुमान ही बाधा उतरविण्यात तरबेज असल्याचा भाविकांचा विश्वास आहे व त्यामुळेच या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी नेहमीच असते. अर्थात येथे हनुमानाचा जयजयकारा केला जातो व त्यामुळे बाधितांची बाधा दुर होते असे सांगितले जाते.

बालरूपात असलेली हनुमानाची ही मूर्ती स्वयंभू आहेच पण त्याच्या हृदयात असलेल्या अगदी सूक्ष्म छिद्रातून अहोरात्र पाणी वाहते. हे जल पवित्र मानले जाते व भाविक हे चरणामृत प्रसाद म्हणून बरोबरही नेतात. या बालाजी मंदिरात प्रेतराज सरकार व कोतवाल कप्तान भैरव यांच्याही मूर्ती आहेत. भूतबाधा झालेल्या लोकांना येथे आणून उपचार केले जातात. विशेष म्हणजे मंदिरातून घरी परतताना आपण प्रसाद नेत असतो मात्र या मंदिरात कोणताही नैवेद्य भाविकांना दाखविता येत नाही तसेच प्रसादही घरी नेता येत नाही. रात्रंदिवस फक्त जयजयकारच येथे ऐकू येत असतो. मंदिरात पाच पाच रूपयांत लाडू मिळतात मात्र ते घरी नेता येत नाहीत. फक्त तीर्थ व अंगाराच घरी नेता येतो.

Leave a Comment