पोकेमॉन गो खेळणार्‍यांच्या आयुष्यात वाढ?

pokemon
पोकेमॉन गो खेळणार्‍यांसाठी एक चांगली बातमी आहे. अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठ व मायक्रोसॉफ्ट रिसर्च टीमने केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की पोकेमॉन गो खेळणारे ४१ दिवस जादा आयुष्य मिळवू शकतात. यासाठी ३२ हजार पोकेमॉन गो खेळाडूंवर सतत तीन महिने लक्ष ठेवून त्यांच्या नोंदी घेतल्या गेल्या आहेत व त्यातून हा अहवाल तयार केला गेला आहे.

आजपर्यंत पोकेमॉन गो खेळण्याच्या नादात अनेक अपघात झाल्याचे, कांही जण प्राणास मुकल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. हा खेळ खेळताना खूपच धोके सल्याचेही मान्य झाले आहे मात्र आरोग्यासाठी हा खेळ फायदेशीर ठरत असल्याचे निरीक्षणातून दिसून आले आहे. या गेममध्ये प्लेअरला आसपास पोकेमॉन शेाधून त्याला पकडायचे असते. यामुळे फिजिकल अॅक्टीव्हीटी वाढते व त्याचा परिणाम आयुष्य वाढण्यावर होतो असा दावा केला जात आहे. हा गेम खेळणारे दररोज १४७३ पावले जादा चालतात असेही आढळले आहे.१५ ते ४९ वयोगटातील व्यक्ती त्यांच्या रोजच्या चालण्यापेक्षा दररोज १ हजार पावले जादा चालली तर त्यांचे आयुष्य ४१ दिवसांनी वाढते असा संशोधकांचा दावा आहे.

या गेमचा फायदा आळशी व जाड लोकांनाही होत असल्याचे व कोणत्याही हेल्थ अॅपपेक्षाही हा गेम आरोग्यासाठी अधिक प्रभावी काम करत असल्याचा दावाही केला जात आहे.

Leave a Comment