दिवाळीत यंदा लोकांची गोव्याला अधिक पसंती

goa
यंदा दिवाळीला जोडून आलेल्या सुट्यांमुळे पाच दिवसांचा लाँग वीकेंड उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अनेकांनी प्रवासाच्या योजना आखल्या आहेत. हॉटेल्स डॉट कॉमवर केल्या जात असलेल्या सर्चवरून असे दिसून आले आहे की भारतीयांनी यंदा परदेशी डेस्टीनेशनमध्ये दुबईला सर्वाधिक पसंती दिली आहे तर भारतात गोव्याला अधिक पसंती दिली आहे. या साईटचा सर्च रिपोर्ट नुकताच जाहीर केला गेला आहे.

यंदा ३० आक्टोबरपासून दिवाळी आहे. इच्छुक प्रवाशांनी १जानेवारी ते ३० सप्टेंबर या काळात हॉटेल डॉट कॉमवर केलेल्या सर्चवरून हा रिपोर्ट तयार केला गेला आहे. परदेशी प्रवासात दुबईनंतर इंडोनेशियातील बाली, थायलंडमधील फुकेत, बँकाँक व सिंगापूरला पसंती दिलेली दिसून येत आहे तर भारतात गोव्यानंतर राजस्थानातील उदयपूर, मुंबई दिल्लीला पसंती दिल्याचे दिसून आले आहे ऑस्ट्रयातील व्हिएन्ना व स्पेनमधील बार्सिलोना साठीही सर्च केले गेले आहे.

Leave a Comment