हुआईचा हॉनर ८ स्मार्टफोन भारतात दाखल

honor
चीनी स्मार्टफोन कंपनी हुवाईने त्यांचा हॉनर ब्रँडमधला हॉनर एट स्मार्टफोन बुधवारी भारतात लाँच केला असून या फोनची किंमत आहे २९९९९. हा फोन अमेझॉन, फ्लिपकार्टसह हॉनरच्या ऑनलाईन स्टोअर्समध्येही उपलब्ध करून दिला गेला आहे. १२ एमपीचा ड्युयल रिअर कॅमेरा हे त्याचे वैशिष्ट आहे. चीनमध्ये हा फोन जुलैत लाँच केला गेला होता व ३२,६४,१२८ जीबी व्हर्जनमध्ये तो सादर केला गेला होता. भारतात तो ४ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोरेजसह सादर झाला आहे.

या फोनसाठी ५.२ इंची फुल एचडी २.५ डी कर्व्हड ग्लास डिस्प्ले, ग्राफिक्ससाठी माली टी ८८० एमपी फोर जीपीयू दिली गेली आहे. अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएसचा हा फोन फोर जीबी रॅम व ३२ जीबीचे इंटरनल स्टोरेजसह आहे. मायक्रोकार्डच्या सहाय्याने इंटरनल मेमरी १२८ जीबी पर्यंत वाढविता येणार आहे. १२ एमपीचा रियर ड्यूअल कॅमेरा ड्युअल टोन एलईडी फ्लॅशसह, लेजर ऑटोफोकस, अपर्चर एफ/२.२, ६पी लेन्ससह आहे. ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा अॅपर्चर एफ/२.४ सह आहे. बॅकसाईडलाच फिंगरप्रिंट सेन्सर व इन्फ्रारेड सेन्सरही दिला गेला आहे. या फोन साठी क्विक चार्ज टेक्नॉलॉजीसह ३००० एमएमएच बॅटरी दिली गेली आहे.

Leave a Comment