वॉरन बफेना रोख रकमेची चिंता

bafet
जगातील सर्वात मोठे गुंतवणुकदार व जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये तिसर्‍या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या वॉरन बफे यांच्यापुढे वेगळीच चिंता निर्माण झाली आहे. ही चिंता आहे ती त्यांच्याकडे जमा होत असलेल्या रोकड रकमेची. या क्षणाला त्यांच्याकडे ७३ अब्ज डॉलर्स कॅश असून दिवसागणिक त्यात भरच पडत चालली आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात यापूर्वी त्यांच्याकडे कधीच रोकड जमा झाली नव्हती असे समजते.

बफे यांना त्यांनी ९० विविध व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीतून दरमहा १.५ अब्ज डॉलर्स व्याजापोटी मिळत आहेत तेही कॅश. शिवाय दररोज त्यांच्याकडून होत असलेल्या लाखो शेअर्सच्या खरेदी विक्रीतूनही त्यांना नफा मिळतो आहे. सध्या त्यांनी कोणत्याही नव्या कंपनीत गुंतवणक केलेली नाही व त्यामुळे अमेरिकेतील गुंतवणूक तज्ञ बफे आता कोणत्या व्यवसायात गुंतवणूक करतील याचे अंदाज करू लागले आहेत. अर्थात बफे यांच्याकडे असलेल्या कॅशमधील २० अब्ज डॉलर्स तरी त्यांना कायम रोख ठेवावे लागतात कारण त्यांच्या मालकीच्या विमा कंपन्यांना कधी अचानक क्लेम पुरे करावे लागले तर ही रक्कम हाताशी असावी लागते असेही समजते. विशेष म्हणजे वॉरन बर्कशायरच्या साच्यात बसतील अशाच कंपनीच्या खरेदीस प्राधान्य देतात व हे व्यवहार करताना ते पूर्ण उद्येागच खरेदी करतात हे त्यांचे वैशिष्ट आहे.

Leave a Comment