फेसबुकच्या ‘वर्कप्लेस’चे व्यावसायिक सादरीकरण

facebook
नवी दिल्ली – आपले नवे फीचर ‘वर्कप्लेस’चे व्यावसायिक सादरीकरण सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने केले असून याद्वारे कंपनी जगाच्या सर्व कंपन्यांना कामाच्या ठिकाणी फेसबुकच्या वापरात बदलू इच्छिते. अधिकृत संदेशवहनात साधारणपणे ईमेलचा वापर होतो. फेसबुक याला ‘वर्कप्लेस’ने बदलू इच्छिते. भारत या नव्या टूलचा वापर करण्याप्रकरणी इतर देशांपेक्षा आघाडीवर आहे.

कंपनीने फेसबुक फॉर वर्कला वर्कप्लेसचे नाव दिले आहे. याला कंपनीने प्रायोगिक प्रकल्पांतर्गत १८ महिने आधी सादर केले होते. या टूलचा वापर सध्या स्टारबक्सपासून डेनॉन, भारतात गोदरेजपासून येसबँक, सिंगापूरच्या शासकीय तंत्रज्ञान यंत्रणा आणि ऑटोरिक्षा एग्रीगेटर जुगनू, लॉजिस्टिक कंपनी डेलिव्हरीमध्ये होत आहे. वर्कप्लेस वापर करणाऱया देशांमध्ये भारतानंतर नॉर्वे, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सचा क्रमांक लागतो.

Leave a Comment