अत्याधुनिक वैशिष्टय़ांसह आली बीएमडब्ल्यूची ‘मोटोरेड’

bmw
नवी दिल्ली – आपली नवी बाइक कॉन्सेप्टला बीएमडब्ल्यूने अत्याधुनिक वैशिष्टय़ांसह सादर केली आहे. बीएमडब्ल्यू मोटोरेड असे या बाइकचे नाव ठेवण्यात आले आहे. कंपनीच्या व्हिजन नेक्स्ट १००च्या धर्तीवर या बाइकला सादर करण्यात आले. आतापर्यंत बीएमडब्ल्यूने आपल्या व्हिजनंतर्गत ३ विविध सेल्फ ड्रायव्हिंग कॉन्सेप्ट कार्स सादर केल्या होत्या, परंतु मोटोरेड याप्रकारातील पहिलीच बाइक आहे.

या बाइकचे प्रंटपासून रीयर व्हीलपर्यंत एक पूर्ण स्ट्रक्चर आहे. बीएमडब्ल्यूने या स्ट्रक्चरला फ्लेक्सीप्रेम असे नाव दिले आहे. कारण या प्रेमध्ये कोणताही जॉइंट नाही. अशा स्थितीत हँडलबार्स फिरविल्याने पूर्ण बाइक मूव्ह होते. बाइकला चांगल्या व्हील्ससह सादर करण्यात आले असून जर बाइकवर मोशनलेस स्थितीत कोणी बसले असेल तरी ही बाइक खालच्या दिशेने कोसळणार नाही.

बाइकला ऍक्टिव्ह एसिसटेंस सिस्टीमसोबत सादर करण्यात आले आहे, जेणेकरून रस्त्यावर नसताना देखील बाइक स्थिर राहते असे कंपनीने सांगण्यात आले. सीट आणि फ्लेक्सप्रेम कार्बन फायबरने बनविण्यात आले आहे. याद्वारे वजन कमी राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाइक रीयल्टी ग्लाससोबत सादर करण्यात आली आहे, हे याचे सर्वात चांगले वैशिष्टय़ आहे. या ग्लासवर डिस्प्ले इन्फॉर्मेशन मिळते असे कंपनीकडून म्हटले गेले.

Leave a Comment