पाळीव प्राणी @ ओएलएक्स

olx
भिवानी – ऑनलाईन खरेदी-विक्रीचा बाजार भिवानी जिल्ह्यात सातत्याने वाढत असून ओएलएक्सवर पशूंचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी प्राण्यांची खरेदी व विक्री सुरू केली आहे. या कामातून त्यांचा वेळ वाचत असून त्यांना पहिल्याच्या तुलनेत अधिक नफा मिळत आहे.

आता जिल्ह्यातील लोकांनी घर, कार, बाईक आणि अन्य उपयुक्त सामानाबरोबरच पाळीव प्राण्यांची सुद्धा ओएलएक्सवर ऑनलाईन विक्री करायला सुरुवात केली आहे. शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या साधनांची ऑनलाईन विक्री होत असताना आता शेतकऱ्यांनी गायी-म्हशींची ऑनलाईन विक्री करायला सुरुवात केली आहे.

जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता पाळीव प्राण्यांसह गायी-म्हशींची ऑनलाईन विक्री करत आहेत. यामुळे वेळेची बचत तर होतेच शिवाय, घरबसल्या नफा मिळवता येतो. रावलधी गावचे गावकरी नरेश भारद्वाज सांगतात, आता काळ बदलला आहे. ऑनलाईन खरेदी-विक्रीमुळे वेळ आणि पैशाची बचत होते. ते मागच्या सहा महिन्यांपासून ऑनलाईन खरेदी-विक्री साइट्सचा वापर करत आहेत.

पवन कुमार यांचे म्हणणे आहे, त्यांनी आपल्या गाईची संपूर्ण माहिती ओएलएक्सवर अपलोड केली होती. त्यामुळे त्यांना आता खूप फोन कॉल्स येत आहेत आणि चॅटिंगच्या माध्यामातून ते भाव करत आहेत. त्यांनी आतापर्यंत ऑनलाईन अनेक पशूंची विक्री केली आहे.

Leave a Comment