भारतातील तिबेटी चालविणार चिनी माल बहिष्कार आंदोलन

boycot
नागपूर – वर्षानुवर्षे चीनी अत्याचारांची शिकार बनलेल्या तिबेटी निर्वासितांनी भारतभर चिनी माल बहिष्कार आंदोलन चालविण्याची योजना असून हे आंदोलन यशस्वी झाले तर चीनला दररोज ६ कोटी रूपयांचे नुकसान सोसावे लागेल असा दावा केला आहे. तिबेटी निर्वासितांनी तिबेटवासियांनी चीनी माल वापरू नये यासाठी अगोदरच जागृती सुरू केली आहे व आता भारतीयांनीही चीनी मालावर बहिष्कार घालावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या आंदोलनाची रणनीती नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहाय्याने आखली गेली असल्याचेही समजते.

या विषयी माहिती देताना नागपूरमध्ये आलेले कोअर ग्रूप ऑफ तिबेटियन कॉजचे संयोजक आर.के खिमे म्हणाले या आंदोलनासाठी २८० तिबेटी ग्रुप एकत्र आले आहेत. चीनला कमजोर बनवायचे असेल तर त्याची आर्थिक कोंडी करणे आवश्यक आहे व त्यांच्या मालावर आपण बहिष्कार घातला तरी दररोज ६ कोटींपेक्षा अधिक नुकसान चीनला सोसावे लागणार आहे. विविध शहरात साखळी पद्धतीने हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या जागृतीसाठी सोशल मिडीयाचा वापरही केला जात आहे. बलुचिस्तानला भारताने सपोर्ट केल्यामुळे आमचे मनोधैर्य उंचावले आहे व आज ना उद्या आम्हालाही आमचा तिबेट मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. राष्ट*ीय स्वंयंसेवक संघ राष्ट्राभिमानी आहे व त्यामुळेच आमच्या तिबेटबद्दलच्या भावना ते समजू शकतात.

आता दिवाळी तोंडावर आहे व या काळात जरी चीनी मालावर बहिष्कार टाकला तर चीनला दररोज १० हजार डॉलर्सपेक्षा अधिक नुकसान सोसावे लागणार आहे असा दावा त्यांनी केला.

Leave a Comment