अकरा अंकी होणार तुमचा मोबाईल नंबर !

mobile
मुंबई : तुमच्या मोबाईलचा नंबर लवकरच अकरा अंकाचा होऊ शकतो. याबाबत एका खाजगी वृत्त वाहिनीला मिळालेल्या माहितीनुसार, अकरा अंकांचा मोबाईल नंबर लागू करण्याचा विचार दूरसंचार विभाग करत आहे. दूरसंचार विभागाकडे असलेली दहा नंबरची सिरीज संपत असल्यामुईल मोबाईल नंबर अकरा अंकांचा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या देशात १०० कोटी मोबाईल ग्राहक आहेत. २०२० पर्यंत हा आकडा वाढून १४० कोटी होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment