लवकरच टोयोटाची नवी फॉर्च्युनर ग्राहकांच्या भेटीला!

toyota
मुंबई: लवकरच नवी फॉर्च्युनर कार टोयोटा लाँच करणार असून ही कार ७ नोव्हेंबरला लाँच करण्यात येणार आहे. या कारला लाँचिंगनंतर फोर्डच्या नव्या एन्डेव्हर आणि शेवरले ट्रेलब्लेजर या कारशी स्पर्धा करावी लागणार आहे.

या नव्या कारमध्ये नवे फीचर्सही देण्यात आले आहेत. यामध्ये १८ इंचीचा अलॉय व्हील दिला आहे. तसेच याच्या टेल लाइटमध्ये देथील बदल करण्यात आला असून याचे नवे डिझाइन तयार करण्यात आले आहे. इनोव्हा क्रिस्टाचे इंजिन नव्या फॉर्च्युनरला देण्यात आले आहे. यामध्ये दोन डिझेल इंजिन पर्यायही आहेत. तर पेट्रोल व्हेरिएंटमध्ये ६ स्पीड म्यॅनुअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायही आहेत.