आसाम अरूणाचल पूल जगातील लांब पुलांच्या यादीत येणार

bridge
आसाम अरूणाचल दरम्यान ब्रह्मपुत्रा नदीवर बांधला जात असलेला पूल पूर्णत्वाचा मार्गावर असून पूर्ण झाल्यानंतर हा आशियातील सर्वाधिक लांबीचा पूल ठरेलच पण जगातील सर्वाधिक लांबीच्या १० पुलातही या पुलाला पाच नंबरचे स्थान मिळेल असे समजते. या पुलाचे बांधकाम २०१० साली सुरू झाले असून त्याची लांबी आहे २५.८ किलोमीटर.

जगातील सर्वाधिक लांबीचा पूल थायलंड बँकाँक येथील बैंगना एक्स्प्रेसवे वर असून या सहा पदरी पुलाची लांबी आहे तब्बल ५५ किमी. २००० साली हा पूल बांधला गेला आहे. अमेरिकेतील द.लुसियाना येथील पॉन्चरट्रेन कॉजवे हा जगातील दोन नंबरचा मोठा पूल असून त्याची लांबी आहे ३८.४ किमी. हा पूल १९ व्या शतकात बांधलेला आहे. दोन पॅरलल ब्रिज असलेला हा पूल या क्षेत्रातील सर्वात जुना पूल आहे. मंचर स्वैम्प हा अमेरिकेच्या लुसियानातील पूल तीन नंबरचा लांब पूल असून त्याची लांबी ३६.६० किलोमीटर आहे व तो १९७० साली बांधला गेला आहे. तर चार नंबरचा पुल हा सौदीतील किंग फदह कॉजवे हा असून तो १९८६ साली बांधला गेला आहे.

Leave a Comment