स्वित्झर्लंडसारखी काचेची रेल्वे आता धावणार भारतात

railway
नवी दिल्ली : स्वित्झर्लंडसारखी काचेची रेल्वे भारतातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतात धावणार असून हा निर्णय भारतातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी घेण्यात आला आहे. पेराम्बूर फॅक्ट्रीमध्ये या कोचचे डिझाईन आयआरसीटीसी आणि आरडीएसओ यांनी तयार केले आहे.

ही ट्रेन या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापासून धावणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. पहिल्यांदा काश्मीरमध्ये आणि त्यानंतर विशाखापट्टणममध्ये ही ट्रेन धावेल, असेही रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. हे कोच बनवण्यासाठी ४ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. २०१५मध्येच हे कोच बनवायला सुरुवात झाली आहे. या महिन्यामध्येच या कोचचे काम पूर्ण व्हायची शक्यता आहे.

Leave a Comment