जळत्या ‘गॅलॅक्सी नोट ७’ चा व्हिडिओ व्हायरल

samsung
सेऊल: जगातील सर्वात मोठी मोबाईल उत्पादक कंपनी असलेल्या ‘सॅमसंग’ला ‘गॅलॅक्सी नोट ७’बाजारपेठेतून परत घेण्याची वेळ आले आहे. याच मॉडेलचा जळता मोबाईल आणि त्याला विझविण्याचा प्रयत्न करणारा ‘बर्गर किंग’चा कर्मचारी यांचा ‘व्हिडिओ’ व्हायरल झाला आहे.

हा ‘व्हिडिओ’ एक दशलक्ष जणांनी बघितला आहे. ‘गॅलॅक्सी नोट ७’ च्या या तांत्रिक अडचणीमुळे ‘सॅमसंग’ने या मॉडेलची विक्री आणि एक्स्चेंज यावर बंदी घालावी लागली आहे. या फोनची बॅटरी गरम होऊन त्याचा स्फोट होतो आणि फोन पेट घेतो अशा अनेक तक्रारी सप्टेंबर महिन्यापासून येऊ लागल्या होत्या.

Leave a Comment