इंटेक्सचा नवा एलईडी टीव्ही लाँच

led
मुंबई: मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी इंटेक्सने दसरा-दिवाळीचा मुहूर्त साधत ३२ इंच एलईडी टीव्ही लाँच केला आहे. अवघी १६,४९० रु. ऐवढी या एलईडी टीव्हीची किंमत आहे. ३२२२ मॉडेलच्या या एलईडी टीव्हीमध्ये आयसेफ टी-मॅट्रिक्स यांचा समावेश आहे.

याबाबत माहिती देताना कंपनीचे संचालक मरक डेय यांनी सांगितले की, आम्ही ग्राहकांच्या भेटीला नवा एलईडी आणला असून त्यामुळे आम्ही फार उत्साहित आहोत. ग्राहकांमध्ये आमचे टीव्ही चांगलेच लोकप्रिय आहेत. या एलईडी टीव्हीवर खास दिवाळी ऑफरही आहे. यासोबत ८००० mAh पॉवर बँक मोफत मिळणार आहे. तसेच टीव्हीवर पाच वर्षापर्यंत वॉरंटी मिळणार आहे. ही ऑफर ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरु आहे. हा एलईडी टीव्ही इंटेक्ससोबतच इतर ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

Leave a Comment