रोबो करणार नर्सिंगचे काम

operation
कांही दिवसांत हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरमध्ये हातात स्काल्प घेऊन रूग्णावरील शस्त्रक्रियेसाठी सज्ज असलेला रोबो दिसला तर नवल वाटायचे कारण नाही. रोबोचे अनेक गुणधर्म यासाठी वैज्ञानिकांना महत्त्वाचे वाटत आहेत. रोबो माणसाच्या कोणत्याही कृतीची उत्तम नक्कल करू शकतात, ते माणसासारख्या चुका करत नाहीत, न थकता तास न तास काम करू शकतात व हे त्याचे गुण उत्तम सर्जन किंवा उत्तम नर्सिंग कौशल्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. वैज्ञानिकांच्या मते याचा अर्थ एखादी शस्त्रक्रिया पूर्णपणे रोबोवर सोपविणे असा नाही तर त्याच्या कौशल्याचा फायदा घेणे हा त्यामागचा उद्देश आहे.

या रोबोंमुळे सर्जरी दरम्यानची सुरक्षा अधिक वाढते असे संशोधकांचे म्हणणे आहे.अशा जबाबदारीच्या कामात माणूस दमला तर त्याच्या हातून चुका होऊ शकतात तो धोका रोबोमुळे टाळता येतो. इटलीच्या पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी ऑफ मिलान मधील इलेना डे मोमी सांगतात, रोबोंमुळे रोजगाराच्या संधी कमी होणार असा प्रचार केला जात आहे मात्र रोबो तुमचे काम हिसकावणार नाहीत तर ताणतणावाची कामे करणार्‍या कुशल तज्ञांवरील कामाचा ताण कमी करणे हा त्यामागचा हेतू आहे. कांही कामे रोबो माणसापेक्षाही सुबक पद्धतीने करतात. शस्त्रक्रियेची हत्यारे वापरण्यात रोबो अतिशय कुशल असल्याचेही दिसून आले आहे व डॉक्टरांच्या हालचालींनुसार तो हे काम करतो त्यामुळे गुंतागुंतीच्या व दीर्घकाळ चालणार्‍या शस्त्रक्रियेत सर्जन रोबो किवा नर्सिग रोबो दिसले तर त्यात नवल नाही.

Leave a Comment