‘गॅलेक्सी नोट ७’ चे उत्पादन सॅमसंगने थांबविले

samsung
सोल – गॅलेक्सी नोट ७ स्मार्टफोन्सचे उत्पादन सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने तात्पुरते थांबविले आहे. हा निर्णय कंपनीने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी घेण्यात आल्याची माहिती एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिली आहे.

गॅलेक्सी नोट ७च्या काही डिव्हाईसेसना आग लागल्याची घटना घडल्यानंतर गेल्या आठवड्यात कंपनीने २५ लाख गॅलेक्सी नोट माघारी बोलाविण्याची घोषणा केली होती. परंतु ग्राहकांना बदलून (रिप्लेसमेंट) दिलेल्या डिव्हाईसला ओव्हरहिटींग आणि बॅटरी ड्रेनेज प्रॉब्लेम्स आढळून आले. अशा प्रकारच्या त्रुटींमुळे डिव्हाईसला आग लागण्याची शक्यता निर्माण होते. गेल्या आठवड्यात अशाच एका डिव्हाईसमधून धूर निघाल्याची घटना घडली, तेव्हा साऊथवेस्ट एअरलाइन्स रिकामी करण्याची वेळ आली होती. अशा प्रकारच्या घटनांमुळे डिव्हाईसच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून सॅमसंगने हा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment