भारताच्या परकीय गंगाजळीतील वाढ चीनसाठी धोक्याची?

videshi
भारताच्या परकीय गंगाजळीत वाढ होत असल्याची खबर भारतासाठी आनंदाची असली तरी चीनसाठी मात्र ती धोक्याची घंटा बनू पाहत असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत. सप्टेंबर अखेर भारताच्या परकीय गंगाजळीत ३७१.९९अब्ज डॉलर्स जमा असून रिझर्व्ह बॅकेच्या आकडेवारीनुसार हाच आकडा २३ सप्टेंबरपर्यंत ३७०.७६अब्ज डॉलर्स होता. तो ३० सप्टेंबरला ३७१.९९ अब्ज डॉलर्सवर गेला आहे.

या तुलनेत चीनच्या परकीय गंगाजळीत सलग तिसर्‍या महिन्यात घट होताना दिसते आहे. चीनमधून गुंतवणुकदार यांचा पैसा काढून घेत आहेत याचा हा सरळ संकेत मानला जात आहे. चीन जगातील दोन नंबरची अर्थव्यवस्था आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत चीनची परकीय चलन गंगाजळी ३.१८५ लाख कोटी डॉलर्स होती ती सप्टेंबरमध्ये ३.१६६ लाख कोटी डॉलर्सवर घसरली असल्याचे समजते. चीन परकीय चलन गंगाजळीत जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानली जाते.

Leave a Comment