अमेरिकन धनकुबेरांच्या यादीत ५ भारतवंशीय

vadhavani
फोर्ब्सने २०१६ साठी जाहीर केलेल्या अमेरिकन धनकुबेरांच्या यादीत पाच भारतीय अमेरिकन लोकांचा समावेश झाला आहे. ४०० जणांच्या या यादीत सलग २३ व्या वर्षी सर्वात श्रीमंत म्हणून बिल गेटस यांचेच नांव आले आहे. या यादीत समाविष्ट झालेल्या भारतीय अमेरिकनमध्ये सिंफनी टेक्नॉलॉजीचे रमेश वाधवानी, आऊटसोअर्सिग फर्म सिनटेलचे सहसंस्थापक भरत नीरज देसाई, विमा क्षेत्रातील राकेश गंगवाल, उद्योजक जॉन कपूर व सिलीकॉन व्हॅली गुंतवणूकदार कवीतर्क राम श्रीराम यांचा समावेश आहे.

वाधवानी यांचा या यादीत २२२ वा नंबर असून त्यांची संपत्ती आहे ३ अब्ज डॉलर्स. भरत देसाई यांना यादीत २७४ वे स्थान आहे व त्यांची संपत्ती आहे २.५ अब्ज. राकेश गंगवाल यांचे स्थान ३२१ वे व संपत्ती २.२ अब्ज डॉलर्स, जॉन कपूर यांचे स्थान ३३५ व संपत्ती २.१ अब्ज डॉलर्स तर श्रीराम यांचे स्थान ३६१ व संपत्ती १.९ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

Leave a Comment