बीएसएनएल वाजवणार इतर टेलिकॉम कंपन्यांचा बाजा

bsnl
नवी दिल्ली: टेलीकॉम क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांसमोर रिलायन्स जिओने आपले फोरजी सीम मार्केटमध्ये उतरवून आव्हान उभे केले. त्यामुळे स्पर्धक कंपन्यांमध्ये जिओला कशी टक्कर द्यायची हा विचार प्राधान्याने सुरू झाला. दरम्यान, या स्पर्धेत आता सरकारी दुरसंचार कंपनी बीएसएनएलनेही उडी घेतली असून आपला नवा प्लान बीएसएनएलने ग्राहकांच्या भेटीला आणला असून, या प्लाननुसार ग्राहकांना अत्यंत कमी पैशात अनलिमिटेड डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे. या प्लानचे नाव ‘BBG Combo ULD 1199’ असे असून लवकरच हा प्लान ग्राहकांच्या भेटीला येणार आहे.

युजर्सला ‘BBG Combo ULD 1199’ ब्रॉडबॅंड प्लानमध्ये फ्लॅट २ एमबीपीएस स्पीड आणि अनलिमिटेड डेटा तसेच, अनलिमिटेड कॉलिंगही फ्री भेटणार आहे. विशेष म्हणजे या प्लानसाठी ग्राहकाला कोणत्याही प्रकारचे इन्स्टॉलेशन चार्जेस लागणार नाहीत. हा प्लान नव्या आणि जून्या अशा सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असून, यात डाऊनलोड आणि अपलोड असे दोन्ही प्रकारचे डेटा अनलिमिटेड असणार आहेत. बीएसएनएलचे म्हणणे असे की, यूजर हा प्लान एक महिन्यापासून ते तीन वर्षांपर्यंत घेऊ शकतात. ग्राहकांना कमी पैशात जास्तीत जास्त इंटरनेट वापराची सुविधा मिळावी हा उद्देश या पाठीमागे असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment