पुन्हा वाढू शकतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती

petrol
मुंबई – आतापर्यंत कच्च्या तेलाच्या किंमतीत १२ टक्क्यांची वाढ तेल उत्पादक राष्ट्रांच्या बैठकीनंतर झाली आहे. इंधनाच्या किंमतीत अमेरिकेतील तेल उत्पादनात घट झाल्यामुळे वाढ होताना दिसून येत आहे. गरजेपेक्षा अधिक कच्च्या तेलाची आयात भारत करतो. त्यामुळे जर या तेलाच्या किंमतीत वाढ झाली तर आयातीच्या दरात वाढ होऊन व्यापारी तुटीत वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीचा परिणाम सरकारच्या अर्थसंकल्पावर झाला तर साहजिकच यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही वाढतील. २७ सप्टेंबरला ब्रेंट कच्च्या तेलाचा भाव ४५.९७ डॉलर प्रति बॅरल होता. तर गुरुवारी याचा भाव ५१.८६ डॉलर प्रति बॅरल इतका झाला होता. तेल उत्पादक राष्ट्रांच्या बैठकीमध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादकांमधील घट दाखविण्यात येणार आहे. यानंतर किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेसह देशावरही होणार आहे.

Leave a Comment