हिरे खाणीचा ई लिलाव करणारे मध्यप्रदेश पहिले राज्य

diamond
मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील कंपोझिट लायसन्ससाठी हातुपुर हिरा ब्लॉकचा ई लिलाव यशस्वी झाला असून मध्यप्रदेश असा ई लिलाव करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या क्षेत्रात १०६ कोटींचे हिरे भांडार असल्याचा दावा केला जात आहे. हे क्षेत्र १३३.५० हेक्टर परिसरात पसरले आहे.

मध्यप्रदेशचे खनिज मंत्रालय सचिव मनोहर दुबे म्हणाले १२ जानेवारी २०१५ च्या केंद्र सरकारच्या नव्या अधिनियमानुसार हा ई लिलाव केला गेला आहे. यामुळे सर्व व्यवहार पारदर्शीपणे करणे शक्य झाले असून बंसल कन्स्ट्रक्शन वर्कस प्रा.लिमिटेड ने या लिलावात सर्वोच्च बोली लावली. या लिलावात रूंगठा माईन्स, त्रिवेणी अर्थमूव्हर्स, पुष्पांजली ट्रेडविन या कंपन्यांनीही भाग घेतला होता.

Leave a Comment