सरकारी आणि खासगी बँकांच्या व्याजदरात कपात

repo-rate
मुंबई : आरबीआय रेपो रेटमध्ये रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी कपात केल्यानंतर आता ४ बँकांनी आपल्या व्याजदर कपात केली असून नवे आणि जुने कर्ज स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पाव टक्के गृहकर्जात सूट मिळणार आहे.

बँकांनी आरबीआय रेपो दरात कपात केल्यानंतर व्याजदरात कपात करण्यासाठी नकार दिला होता. याबाबत नवे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनीही उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता सरकारी आणि खासगी बँकांनी कर्जदरांत कपात करण्यास सुरुवात केली आहे. बँकांची कर्जे स्वस्त झाल्यास त्याचा थेट लाभ गृह, वाहन, कॉर्पोरेट या कर्जांना सर्वाधिक होणार आहे. कर्जकपातीमुळे आगामी काळात कर्जे स्वस्त होणे प्रत्यक्षात येणार आहे. याचा थेट लाभ नव्या ऋणकोंना होणार आहेच, त्याचबरोबर जुन्या तरल व्याजदरांच्या कर्जांनाही हा लाभ घेता येणार आहे.

Leave a Comment