पाक वेबसाईटवर भारतीय हॅकर्सचा सर्जिकल स्ट्राईक

hackers
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळावर यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर भारतातील देशभक्त हॅकर्सनी पाकिस्तानी सरकारच्या वेबसाईटसवर सर्जिकल स्ट्राईक करून चांगलाच दणका दिला आहे. पाकिस्तानसाठी हा सायबर अॅटॅक चांगलाच डोकेदुखी बनला आहे. या हॅकर्सनी पाकिस्तान सरकारच्या अनेक साईटस लॉकच केल्या आहेत यामुळे पाकिस्तानातील विशेषज्ञही हैराण झाले आहेत. असेही समजते की या हॅकर्सना बिटकॉईन स्वरूपात पैसे देण्याची लालूचही पाकिस्तानकडून दाखविली गेली होती मात्र या हॅकर्सनी ती साफ फेटाळून लावली आहे.

भारतीय हकर्सनी अनेक पाकिस्तानी साईटवर कब्जा केला आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी भारतीय सेनेचा स्ट्राईक फर्जी असल्याचे व्हीडीओ प्रसारित केल्यानंतर भारतीय हॅकर्सनी पाकिस्तानला हा दणका दिला आहे. भारतीय सायबर तज्ञांच्या मते या मागे तेलंगणा सायबर वॉरियर्स हा ग्रुप असावा. त्यांनी पाकिस्तानच्या वेबसाईटसवर व्हायरस घालून या साईट लॉक केल्या आहेत. पाकिस्तानकडून या हॅकर्सना सायबर युद्धाची धमकीही दिली गेली असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment