जगातील सर्वात जुने विद्यापीठ अल कुआरोयुईन

morroko
वास्तविक पाहता जगातील सर्वात जुन्या विद्यापीठांचा मान तक्षशिला व नालंदा यांच्याकडे जातो. मात्र आजमितीला ही दोन्हीही विद्यापीठे अस्त्वित्वात नाहीत. या परिस्थितीत जगातील सर्वात जुने व अजूनही कार्यरत असलेले विद्यापीठ म्हणून मोरोक्कोतील अल कुआरोयुईन विद्यापीठाकडे हा मान जातो. हे विद्यापीठ ११५७ वर्षे जुने आहे. विशेष म्हणजे फातिमा अल फिहरी या महिलेने या विद्यापीठाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. अरबी सौदागर मोहम्मद अल फिहरीची ही कन्या होती.

असे समजते की या विद्यापीठाची स्थापना प्रथम मशीद म्हणून केली गेली होती. नंतर त्याचे रूपांतर मदरसा, कॉलेज व विद्यापीठ असे होत गेले. येथे सुरवातीला इस्लाम धर्माचे शिक्षण दिले जात असे मात्र नंतर तेथे गैरइस्लामिक विषयांचेही शिक्षण सुरू झाले. सुरवातीला येथील विद्यार्थी १३ ते ३० वयोगटातील असत. हे विद्यापीठ इतके मोठे आहे की एकाचवेळी तेथे २२ हजार विद्यार्थी शिकू शकतात.

इतिहासकार इब्न खाल्दन, ज्यू तत्त्ववेत्ता मेनोनाइडस, जिओग्राफर मुहम्मद अल इदरीसी या नामवंतांनी येथे शिक्षण घेतले असल्याचेही सांगितले जाते.

Leave a Comment