आयफोन सेव्हनसाठी फ्लिपकार्ट सीईओ डिलिव्हरीबॉय

binni
भारतात अॅपल आयफोन सेव्हन व प्लस शुक्रवारी सायंकाळ पासून विक्रीसाठी उपलब्ध झाला असताना फ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांनी त्यांच्या कांही ग्राहकांना स्वतः आयफोन सेव्हनची डिलिव्हरी दिली आहे. आपल्या ग्राहकांना आयफोन वेळेत पोहोचावा म्हणून कंपनीच्या अनेक अधिकार्‍यांनी ग्राहकांना स्वतःच डिलिव्हरी देऊन सरप्राईज दिले आहे. विशेष म्हणजे देशाच्या विविध शहरात हे सरप्राईज ग्राहकांना मिळाले आहे.

अॅपलने त्यांच्या आयफोन विक्रीसाठी फ्लिपकार्टबरोबर गेल्याच महिन्यात करार केला होता.त्यानुसार फ्लिपकार्टला थेट अॅपलकडूनच आयफोनचा पुरवठा केला जाणार आहे. आजपर्यंत फिलपकार्ट थर्ड पार्टीकडून आयफोन खरेदी करून ते ग्राहकांना विकत असे. फ्लिपकार्टला भारतीय बाजारातून मिळणार्‍या महसूलातील मोठा भाग स्मार्टफोन विक्रीतूनच येतो. मोटोरोला व लेईकोचे कांही ब्रँड फक्त फ्लिपकार्टवरच उपलब्ध आहेत. आयफोन विक्रीतून प्रतिस्पर्धी कंपनी अॅमेझॉनला टक्कर देण्यात फ्लिपकार्ट यशस्वी होईल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

Leave a Comment