प्रवाशांच्या मोबाईल, लॅपटॉपसाठी रेल्वेची विमा योजना

bima
रेल्वे प्रवाशांसाठी राबविलेल्या विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता आयआरसीटीसी प्रवाशांच्या मोबाईल, लॅपटॉप सारख्या गॅजेटसाठीही विमा योजना सुरू करण्याच्या विचारात असल्याचे आयआरसीटीसीचे अध्यक्ष ए.के.मनोचा यांनी सांगितले. ते म्हणाले, या संदर्भात विमा कंपनी अधिकार्‍यांसोबत पहिली बैठक पार पडली आहे.

विमा कंपन्यांकडून या गॅजेटसबाबत चोर्‍यांचे खोटे क्लेम केले जाण्याबाबत काळजी व्यक्त केली गेली आहे. मात्र त्यावर कांही उपाय काढला जाईल. सुरवातीला क्रेडीट कार्ड धारक व सरकारी अधिकार्‍यांपुरतीच ही योजना राबविण्याबाबतही विचार सुरू आहे. चोरी व रेल्वे अपघातासाठी हा विमा लागू राहिल असेही मनोचा यांनी सांगितले.

Leave a Comment