जिओ आयफोन-७ युजर्सना देणार पंधरा महिने मोफत सेवा

jio
नवी दिल्ली : आयफोन-७ च्या खरेदीसाठी सध्या मुंबई-पुण्यामध्ये ग्राहकांची झुंबड गर्दी होत असताना मुकेश अंबानीच्या जिओ या ४जी नेटवर्कची सेवा वर्षभर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स कंपनीने हा निर्णय आयफोन युजर्सना आकर्षित करण्यासाठी घेतला आहे. रिलायन्स ‘जिओ‘ ४जी सेवेच्या वेलकम प्लानची क्रेझ अजूनही स्मार्टफोन युजर्समध्ये कायम असून हा प्लॅन ३१ डिसेंबर २०१६पर्यंत मर्यादित असून आयफोन युजर्सना मात्र ही ४जी सेवा १५ महिने घेता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रिलायन्स रिटेल,ऍपल स्टोअरमधून कोणतेही ऍपल डिव्हाईस घेतल्यानंतर रिलायस जिओ नेटवर्क वापरल्यास त्यांना ‘वेलकम ऑफर‘चा लाभ घेता येईल.

आयफोन युजर्सना एक जानेवारीपासून १४९९ रुपयाचा प्लान पूर्णपणे मोफत असेल. हा प्लान अठरा हजार रुपयाच्या किंमती इतका आहे. या प्लानमध्ये अमर्याद एसटीडी कॉल्स, व्हॉईस कॉलिंग,नॅशनल रोमिंग, ४जी डेटा, २०जीबीपासून पुढे, रात्री ४जीसाठी ४० जीबी डेटा, अमर्याद एसएमएस, अमर्याद जिओ ऍपचे सबस्क्रिपशन यांचा समावेश आहे. ऍपल युजर्स जिओ नेटवर्कच्या साह्याने शंभर टक्के फोरजीचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये उच्च दर्जाचे व्हॉईस कॉल,हाय डेफिनेशन फेसटाइम कॉल्स, बफर फ्री एचडी व्हिडिओ तसेच ३०० लाइव्ह टिव्ही बघता येतील. रिलायन्स जिओमुळे इतर नेटवर्किंग कंपन्यांमधील स्पर्धा अत्यंत तीव्र झाली आहे. एअरटेल कंपनीने त्यांच्या इन्फिनिटी पोस्टपेड प्लानमध्ये महिनाभर थ्रीजी आणि फोरजीवर १० जीबीपर्यंतचा डेटाचा एक वर्षभरापर्यंत लाभ घेऊ शकता.

Leave a Comment