तैवानमधील आयटी कंपन्यांची झारखंड मध्ये गुंतवणूक

taiwan
तैवान मधील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी झारखंड मध्ये ३० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे समजते. उद्योग मंत्रालयाचे सचिव सुनील वर्णवाल यांनी गुरूवारी या भागात गुंतवणुकीसंदर्भाने झालेल्या बैठकीत तैवान मधील अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाल्याचे सांगितले. वर्णवाल यांनी यावेळी झारखंड सरकारने गुंतवणूकदारांसाठी आखलेल्या योजनांची माहिती दिली.

वर्णवाल म्हणाले मेक इन इंडिया अंतर्गत गुंतवणुकदारांसाठी विशेष सत्र आयेाजित केले गेले होते. त्यात तैवानच्या मसलन फोस्ट्रेंड, आयसी नेक्स, टीवाय ओतल या कंपन्यांनी गुंतवणुकीत रस दाखविला असून या संदर्भात लवकरच अंतिम बोलणी केली जातील.

Leave a Comment