बँकेच्या सुट्ट्यांमुळे नागरिकांची उडणार तारांबळ

bank
नवी दिल्ली – सलग ५ दिवस देशातील सर्व बँकांना सुट्टी असल्यामुळे बँकेशी संबंधित काम असल्यास ते निपटून घेण्याचे आवाहन बँक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. त्यासह नागरिकांची तारांबळ उडणार नाही यासाठी एटीएममध्ये शिल्लकीची रक्कम भरण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांची तारांबळ उडणार आहे.

बँकांना शनिवार ८ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबरपर्यंत सलग सुट्टी असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची तारांबळ उडणार आहे. त्यासाठी नागरिकांनी अपले बँकेचे काम लवकर निपटण्याचा सल्ला बँक अधिकाऱ्यांनी दिला आहे. ८ ऑक्टोबरला महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने सुट्टी आहे. तर ९ ऑक्टोबरला रविवार आहे. ११ ऑक्टोबरला दसऱ्याची सुट्टी आहे. तर १२ ऑक्टोबरला मोहरमची सुट्टी आहे. त्यामुळे बँका सलग ५ दिवस बंद राहणार आहेत.

Leave a Comment