टाटा जग्वारची एफ पेस एसयूव्ही भारतात लाँच होणार

jaguar
टाटा मोटर्सच्या मालकीची ब्रिटीश कार उत्पादक कंपनी जग्वार लँडरोव्हरने त्यांची नवी एफ पेस ही एसयूव्ही २० आक्टोबरला भारतात लाँच करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. या कारच्या किंमतीही जाहीर केल्या गेल्या आहेत. ही कार ६८.४ लाखांपासून सुरू होत असून तिचे टॉप एन्ड मॉडेल १ कोटी १२ लाख रूपयांना मिळणार आहे.

या एसयूव्हीची बॉडी अॅल्यमिनियमची आहे त्यामुळे कारचे वजन कमी झाले आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी आणखीही कांही तंत्रे वापरली गेली आहेत. कारच्या फ्रंटमध्ये सिग्नेचर जग्वार ग्रील व अॅडाप्टीव्ह एलईडी हेडलाईट दिले गेले आहेत. २५.९१ सेंमी चा टॅब्लेट स्टाईल टचस्क्रीन आहे तसेच या कारसाठी दोन इंजिन ऑप्शन्सही आहेत. तिला २.० लिटर इंजेनियम डिझेल तसेच ३.० लिटर टर्बोचार्ज व्ही ६ मोटर दिली गेली आहे. २.० लिटर इंजिन मॉडेलची किंमत ६८.४० लाख असून ती डिझेल कार आहे.

Leave a Comment