आजपासून भारतात बहुचर्चित अॅपल आयफोन ७ उपलब्ध

iphone-7
नवी दिल्ली- आज भारतात आपल्या दर्जेदार उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या अॅपल कंपनीचा आयफोन ७ लाँच होत असून अॅपलने ज्याप्रमाणे अमेरिकेत मध्यरात्री फोन लाँच केला त्याप्रमाणे भारतात लाँचिंग न होता आज संध्याकाळी सात वाजेपासून हा फोन उपलब्ध होणार आहे. या दोन्ही आयफोनची बॉडी ग्लास आणि मेटलपासून बनवली असून ते वॉटर आणि डस्ट प्रूफ आहेत.

आयफोन ७ मध्ये ऑपरेटिंग सिस्टम iOS १०, आयफोन ७ हा ३२ जीबी, ६४ जीबी आणि २५६ जीबी मध्ये उपलब्ध आहे. कॅमेरा – रिअर १२, फ्रण्ट ७ मेगापिक्सेल, ड्यूएल कॅमेरा सेटअप रॅम २ जीबी, आयफोन ७ आणि ७ प्लसमध्ये स्टेरिओ स्पीकर्स आहे. एक स्पीकर वर असून दुसरा फोनच्या खाली आहे. यामध्ये रेटिना एचडी डिसप्ले असून तो पूर्वीच्या आयफोनपेक्षा २५ टक्के ब्राईट आहे. विशेष म्हणजे हे आयफोन ३डी टच असून वायरलेस पद्धतीने चार्ज करता येणार आहेत. आयफोन ७ आणि ७ प्लसमध्ये ३.५mm ऑडिओ जॅक नाही. अॅपल इयर पॉड्स लायटनिंग कनेक्टरद्वारे वापरता येऊ शकते. होम बटण ऐवजी फोर्स सेन्सिटिव्ह बटण, स्पीकर्स स्टेरिओ स्पीकर्स, सुपर मारियो व्हिडीओ गेम. या फोनची किंमत ६०,००० रुपयांपासून पुढे आहे. ३२ जीबी फोनची किंमत ही ६०,००० असेल.

आयफोन ७ प्लसमध्ये ऑपरेटिंग सिस्टम iOS १०, आयफोन ७ प्लस हा ३२ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबीमध्ये उपलब्ध असणार आहे. रॅम आयफोन आणि वॉचची ४ जीबी, कॅमेरा – रिअर १२, फ्रण्ट ७ मेगापिक्सेल, ड्यूएल कॅमेरा सेटअप, होम बटण ऐवजी फोर्स सेन्सिटिव्ह बटण, स्पीकर्स- स्टेरिओ स्पीकर्स, सुपर मारियो व्हिडीओ गेम तसेच दोन्ही आयफोन ब्लॅक, जेट ब्लॅक, सिल्व्हर, गोल्ड, रोज गोल्ड या रंगात उपलब्ध आहेत. २५६ जीबी फोनची किंमत ९२,००० रुपये असणार आहे.

Leave a Comment