यशस्वीपणे अवकाशात झेपावले जीसॅट-१८ उपग्रह

gsat
बंगळुरू – अखेर यशस्वीपणे खराब हवामानामुळे उड्डाण पुढे ढकलण्यात आलेले जीसॅट-१८ अवकाशात झेपावले आहे. जीसॅट-१८ ने अरियन स्पेस-५ रॉकेटच्या माध्यमातून उड्डाण घेतले आहे, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थाने (इस्रो) सांगितले आहे.

फ्रेंच गौनामधील कोवरोऊ येथून अरियन स्पेस-५ रॉकेटने झेप घेतली. तेथील स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे हे रॉकेट अवकाशात झेपावणार होते. जोरदार वारा वाहत असल्यामुळे उड्डाणाला अडचणी येत होती. त्यामुळे खराब हवामानामुळे हे उड्डाण २४ तासांसाठी पुढे ढकलण्यात आले होते. अखेर गुरुवारी हे रॉकेटने उड्डाण घेतले. अरियन उपग्रहवाहू रॉकेटद्वारे जीसॅट-१८ सह ऑस्ट्रेलियाचे स्काय मस्टर दुसरे हेही अवकाशात झेपावले. जीसॅट-१८ हे भारतीय अवकाश संशोधन संस्थाने तयार केलेले २० वे उपग्रह आहे.

Leave a Comment