पीएफसाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही

epfo
नवी दिल्ली – आतापर्यंत भविष्यनिधीतील रक्कम काढण्यासाठी अथवा बँक खात्यात जमा करण्यासाठी कंपनीच्या परवानगीची आवश्यकता होती. यामुळे पीएफमधील रक्कम काढताना सदस्यांना अनेक कष्ट सहन करावे लागत होते. मात्र आता संघटनेने यात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पूर्वीची प्रक्रिया ही वेळखाऊ आणि सदस्य प्रेन्डली नसल्याने अनेकजण नाराजी व्यक्त करत होते. मात्र आता ही रक्कम काढण्यासाठी कंपनीच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता भासणार नाही.

युनिव्हर्सल खाते क्रमांक (यूएएन) ज्या सदस्यांकडे आहे, अशा सदस्यांसाठी कर्मचारी भविष्यनिधी संघटनेने नवीन अर्ज जारी केला आहे. या अर्जावर कंपनीच्या स्वाक्षरीची गरज भासणार नाही. यासाठी ग्राहकांना ‘यूएएन बेस्ड फार्म १९’चा वापर करावा लागणार आहे. या अर्जावर कंपनीच्या स्वाक्षरीची गरज नाही. यूएएन सक्रिय असणा-या आणि केवायसी माहिती देण्यात आली आहे, त्यांना या सेवेचा लाभ घेता येईल. सध्या हा अर्ज ऑफलाइन जमा करता येईल, लवकरच तो ऑनलाईनही देता येईल. कोणताही सदस्य ६० दिवसांपासून बेरोजगार असेल तर तो पूर्ण रक्कम काढू शकतो. तसेच नोकरीला लागल्यापासून ५ वर्षाच्या आता पीएफ काढल्यास रकमेवर कर लागू होतो. कंपनीचा हिस्सा आणि त्याच्या व्याजावर कर्ज द्यावे लागते. ५४ पेक्षा जास्त वय असणारा सदस्य व्याजासोबत ९० टक्के रक्कम काढू शकतो. याचबरोबर सर्व रक्कम काढण्यासाठी ५५ वर्षे पूर्ण अथवा तो नोकरीवरून निवृत्त झालेला असावा.

Leave a Comment