कोणताही फोन अनलॉक करणारी सेलेब्राईट कंपनी

unlock
इस्त्रायलची कंपनी सेलेब्राईट या वर्षात जरा जादाच चर्चेत राहिली आहे. जगातला कोणताही फोन अनलॉक करण्याचा दावा ही कंपनी करते व याच कंपनीने अमेरिकेतील बर्नाडिनो येथे झालेल्या हल्ल्यातील प्रमुख संशयित रिझवान फारूक याचा आयफोन फाईव्ह अनलॉक करण्यासाठी एफबीआयला मदत केली होती असे सांगितले जाते.

या कंपनीने ब्रिटनमध्ये नुकतीच कोणताही आधुनिक फोन कसा अनलॉक करता येतो याची प्रात्यक्षिके दाखविली. त्यासाठी वापरल्या जाणार्‍या सॉफ्टवेअ्रर व उपकरणांची माहिती ब्रिटन पोलिसांनीही घेतली. कंपनीचे अधिकारी जुव बेन मोश या संदर्भात म्हणाले की आम्ही सर्वसाधारण टॅब्लेटसारख्या उपकरणाचा वापर त्यासाठी करतो. हे उपकरण अनेक पोलिस दलांनाही पुरविले गेले आहे. हे उपकरण अनलॉक करायच्या मोबाईला जोडायचे व सॉफ्टवेअरच्या सहाय्याने त्यातील डेटा काढायचा अशी ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेने कोणताही फोन अनलॉक करता येतो.

कंपनीच्या म्हणण्यानुसार गुन्हेगारांचा असा समज असेल की ते त्यांच्या कारवायांसाठी वापर करत असलेला मोबाईल सर्वाधिक सुरक्षित आहे तर तो त्यांचा गैरसमज आहे. अर्थात असे फोन अनलॉक करताना ग्राहकांची माहिती कंपनीकडून लीक केली जात नाही. मोबाईल उत्पादक कंपन्या त्यांची उपकरणे सुरक्षित बनविण्यासाठी अनेक नवनवीन तंत्रे शोधून नफा कमवत आहेत मात्र गुन्हा तपास करणार्‍या पोलिसांसाठी ती डोकेदुखी बनते आहे. फोन अनलॉक झाले नाहीत तर गुन्ह्यातील महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळू शकत नाही. येथे आमची कंपनी पोलिसांच्या मदतीसाठी येते.

Leave a Comment