६४ वर्षांपासून कापली नाहीत या अवलियाने नखे

shridhar-chillal
पुणे- सध्या शहरभर बिबवेवाडी येथील ८० वर्षांच्या श्रीधर चिल्लाळ नावाच्या अवलियाची चर्चा सुरू असून ही चर्चा त्यांच्या डाव्या हाताच्या नखांच्या असलेल्या लांबीवरून होत आहे. तब्बल ३० फूट साडेचार इंच इतकी त्यांच्या डाव्या हाताच्या नखाची लांबी आहे.

१९५२ सालापासून म्हणजे जवळपास ६४ वर्षांपासून चिल्लाळ यांनी आपल्या डाव्या हाताची नखे कापली नाहीत. नखांच्या संरक्षणासाठी पिशवी तयार करून ते वावरतात. विशेष म्हणजे त्यांच्या या विक्रमाची नोंद १९८० साली गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच नखांची वाढ चालू असताना त्यांनी शेतकरी मासिकामध्ये फोटोग्राफर म्हणूनही काम केले आहे. दरम्यान वयोमर्यादेमुळे त्यांना ही नखे दिवसेंदिवस सांभाळणे कठीण होत असल्याने एखाद्या म्युझियममध्ये देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.