वर्षभरासाठी झाकला जाणार ताजमहाल

tajmahal
आग्रा (उत्तर प्रदेश) – आपल्या सौंदर्याची जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या ताजमहलाच्या मुख्य घुमटाला मातीचा मुलामा देण्याचा निर्णय पुरातत्त्व खात्याने घेतला असून त्यासाठी घुमटाभोवती स्टिलचे स्ट्रक्चरही तयार केले जाणार आहे. हा मुलामा सुमारे वर्षभर कायम ठेवला जाणार आहे. सुमारे २ मिमीचा हा मुलामा असेल. त्यामुळे पर्यटकांना संबंध ताज बघण्याची आणि त्याच्यासमोर उभे राहून फोटो काढण्याची संधी मिळणार नाही.

गेल्या काही वर्षांपासून पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांपासून तयार करण्यात आलेल्या ताजमहालाला पिवळेपणाची एक लेअर आली आहे. त्याची चर्चा देश-विदेशात रंगली आहे. प्रदुषण, जुनी वास्तू आणि इतर कारणांमुळे ही लेअर आल्याचे सांगितले जाते. पण ती दूर करायची असेल तर नॅचरल थेरपी करण्याची गरज असल्याचे पुरातत्त्व खात्याने सांगितले आहे. त्यामुळे मड थेरपीचा निर्णय घेण्यात आला आहे.

पण मातीचा मुलामा दिल्यानंतर लगेच त्याचे परिणाम दिसणार नाहीत. सुमारे वर्षभर हा मुलामा ताजच्या मुख्यघुमटावर ठेवावा लागणार आहे. हा थर सुकल्यानंतर नॉयलॉनच्या ब्रशने काढला जाईल. अत्यंत स्वच्छ पाण्याने ही वास्तू धुतली जाईल. त्यानंतर पर्यटकांना पांढऱ्या शुभ्र ताजमहालाचे दर्शन करता येईल.

Leave a Comment