याच आठवड्यात ट्विटरचा लिलाव ?

twitter
न्यूयॉर्क: सध्या बलाढ्य कंपन्यांमध्ये जगातील सर्वात मोठी मायक्रो ब्लॉगिंग सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरची मालकी मिळवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. या कंपनीच्या मालकीसाठी गूगल, सेल्सफोर्स आणि वॉल्ट डिस्नीसारख्या कंपन्यांमध्ये काट्याची टक्कर दिसत आहे. आता एका नव्या वृत्तानुसार या आठवड्यातच टविटरच्या मालकीसाठी लिलाव होण्याची शक्यता आहे.

याबाबत वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बीनिऑफ आपल्या कंपनीच्या गुंतवणूकदारांना आणि शेअर होल्डर्सना ट्विटरची मालकी मिळवण्यातील फायदे पटवून देत असल्यामुळे लिंक्डइनप्रमाणेच ट्विटरच्या खरेदीसाठी सेल्सफोर्सकडून मोठी बोली लावली जाण्याची शक्यता वॉल स्ट्रीट जर्नलने व्यक्त केली आहे.

लिंक्डइनच्या मालकीसाठी सेल्सफोर्सकडून मोठी बोली लावण्यात आली होती. मात्र त्याच्या वरचढ बोली लावून मायक्रोसॉफ्टने मिळवली. दरम्यान, सेल्सफोर्सने मायक्रोसॉफ्टकडून लिंक्डइनच्या अधिग्रहणामध्ये अडथळे निर्माण केले आहेत. कारण सेल्सफोर्सच्या मते, मायक्रोसॉफ्टने लिंक्डइनच्या अधिग्रहण प्रक्रीयेत नियनांचे उल्लंघन केले आहे.

तर दुसरीकडे ऑर्कुट आणि गूगल प्लसच्या माध्यमातून गूगलने सोशल मीडियामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न यापूर्वीही केला होता. मात्र त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले होते. पण ट्विटरच्या खरेदीसाठी पुन्हा पुढाकार घेतला आहे. आपल्या नव्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमच्या माध्यमातून गूगल ट्विटर अॅपचा प्रसार करण्याच्या तयारीत आहे.

Leave a Comment