ई कॉमर्स क्षेत्रातील मल्टीनॅशनल कंपनी अमेझॉनने त्यांच्या १ ते ५ आक्टोबर या काळात भरविलेल्या फेस्टीव्ह सेलला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळविला असल्याचे कंपनीचे भारत प्रमुख अमित अग्रवाल यांनी सांगितले. ते म्हणाले सेल संपण्यास कांही तासांचा अवधी असतानाच कंपनीने ५ कोटीहून अधिक ग्राहकांना मालाची डिलिव्हरी पोहोचविली आहे. यंदाच्या वर्षात या सीझनमध्ये आमच्या विक्रीत तिपटीहून अधिक वाढ झाली.
फेस्टीव्ह सेलमध्ये अमेझॉनची विक्रमी विक्री
अग्रवाल म्हणाले यंदा आमच्या नवीन ग्राहकांत पाचपट वाढ झाली असून त्यातील ७० टक्के ग्राहक टू टियर, थ्री टियर शहरातले आहेत. या शहरातील ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे कारण त्यामुळे या शहरांतून आमच्या व्यवसाय वाढीसाठी असलेल्या संधी समोर आल्या आहेत.