पाकमधील बलुचिस्तानात हिंदू-मुस्लिम एकत्र पूजतात हिंगलाज देवीला

devi
पाकिस्तानमधील बलूचिस्तानात देवी हिंगलाज मंदिरमध्ये हिंगलाज शक्तीपीठातील प्रतिरूप देवीची प्राचीन मूर्ती असून देवी हिंगलाजची लोकप्रियता कराची आणि केवळ पाकिस्तानातच नाहीतर भारतातही आहे. कराची जिल्ह्याच्या वाडी कलामध्ये विराजमान असलेल्या देवीचे मंदिर डोंगरात आहे.

देवीचे हे एक शक्तीपीठ पाकिस्तानमध्ये असून केवळ हिंदूच या देवीची पूजा करतात असे नाहीतर मुस्लिम लोकही करतात. हिंदू लोक या देवीला ‘देवी हिंगलाज’रूपात पूजतात तर मुस्लिम ‘नानी का हज’ म्हणतात. या मंदिरात येऊन हिंदू-मुस्लिम ही दरी एकत्र मिळते. पुराण कथांनुसार, जेव्हा भगवान शंकर माता सतीचे मृत शरीर खांद्यावर घेऊन तांडव करू लागले होते, तेव्हा ब्रम्हांडाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णुने त्यांच्या सुदर्शन चक्राने मातेच्या मृत शरीराचे ५१ तुकडे केले होते. मान्यतानुसार, हिंगलाज हे तेच स्थळ आहे जिथे मातेचे डोके पडले होते.

येथील हे मंदिर खूप लोकप्रिय असून वर्षभर येथे भाविकांची गर्दी बघायला मिळते. नवरात्री दरम्यान येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सिंध आणि कराचीमधून हजारो भाविक मातेचे दर्शन घेण्यासाठी येतात.

Leave a Comment