स्नॅपचॅटचा चष्मा करेल व्हिडीओ शूटिंग

chashma
स्नॅपचॅट मेसेजिंग अॅपने त्यांचे पहिले गॅजेट बाजारात सादर केले असून हा कॅमेरा असलेला एक चष्मा आहे. स्पेक्टेकेल्स असे याचे नामकरण केले गेले आहे. हा एक विशेष प्रकारचा चष्मा असून या वर्षअखेर तो बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे. याची किंमत आहे १३० डॉलर्स म्हणजे ८७१० रूपये. हा चष्मा एकावेळी ३० सेकंदाचा व्हिडीओ बनवू शकतो. स्नॅपचॅट युवावर्गात अतिशय लोकप्रिय आहे व त्यामुळेच या विशेष चष्म्यालाही युवावर्गाकडून चांगली मागणी येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी गुगलनेही गुगल ग्लास बाजारात आणली होती मात्र त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने गुगलने त्याचे उत्पादन थांबविले होते. या ग्लासमुळे प्रायव्हसीवर अतिक्रमण होत असल्याचे मत व्यक्त केले गेले होतो मात्र स्नॅपचॅट चा स्पेक्टेकेल्सबाबत मात्र अजब अनुभव अशी प्रतिक्रिया व्यक्त केली गेली आहे. शिवाय गुगल ग्लासच्या १५०० डॉलर्सच्या किंमतीच्या तुलनेत हा चष्मा खूपच स्वस्त असल्याने ग्राहकांकडून त्याला पसंती येत असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment