जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनचे प्ले अॅप

vodafone
मुंबई – टेलिकॉम कंपनी वोडाफोन इंडियाने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एक शानदार ऑफर दिली आहे. वोडाफोनने आपल्या युझर्ससाठी डिसेंबरपर्यंत वोडाफोन प्ले अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन दिले आहे. या ऑफर अंतर्गत युझर्स १८० लाईव्ह टीव्ही चॅनलसोबतच १४ हजारहून अधिक सिनेमा, टीव्ही शो आणि म्युझिक ऑडियो व्हिडिओचा लाभ घेऊ शकतात.

कंपनीने सांगितले आहे की, या अॅपला युझर्स गुगल प्ले स्टोर आणि अॅपल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करू शकतात. कंपनीचे संचालक संदीप कटारिया यांनी सांगितले की, ग्राहकांना स्मार्टफोन्सवर अधिक व्हिडिओ बघायला आवडतात. आणि त्या सोबतच गाणी देखील ऐकायला आवडतात. यासाठी युझर्स वेगवेगळे अॅप डाऊनलोड करतात. यासाठी कंपनी ग्राहकांना त्यांच्याकडून ही ऑफर देऊ इच्छिते. त्यामुळे आता ग्राहकांना वेगवेगळे अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही.

युझर्स वोडाफोन प्लेच्या मार्फत ऑल इन वनची मजा घेऊ शकतात. आता रिलायन्स जिओ प्लान्स लाँच नंतर अनेक टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येणार आहेत. याचा सरळ सर्व फायदा हा युझर्सला होईल. युझर्सला त्यांना हवे तसे प्लान वापरता येतील. टेलिकॉम कंपनी वोडाफोन इंडियाने यावर्षी ३१ डिसेंबरपर्यंत आपल्या सर्व यूजर्सना प्ले अॅपच्या फ्री सब्सक्रिप्शनची घोषणा केली आहे. या अॅपवर अनेक भाषेतील १४०००हून अधिक चित्रपट उपलब्ध आहेत. वोडाफोन प्ले एक खास अॅप आहे. ज्यामध्ये व्हिडिओ टेलिव्हिजन शो, चित्रपट, न्यूज चॅनल तुम्हाला पाहता येणार आहेत.

Leave a Comment